"पाठीवरती हात ठेवुनी फ़क्त लढ म्हणा"

       मंत्रभुमीकडुन यंत्रभुमीकडे आणि रुद्राक्षभुमीकडुन द्राक्षभुमीकडे वाटचाल करणा-या नाशिकनगरीला ’स्मार्ट सिटी’ कडे नेण्यासाठी पंचवटीपासुन पेंटीयमकडे प्रगतीपथावर नेण्यासाठी नाशिक महानगरपालिका शिक्षण विभाग प्रयत्नरत आहे.
       शिक्षण हक्क कायद्यानुसार एकही मुल शाळाबाह्य राहणार नाही, शाळेत येणा-या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापुर्ण शिक्षण मिळते. बुद्धीगुणांकासोबतच (IQ) भावनिक गुणांक (EQ) वाढुन उद्याचा जबाबदार नागरिक घडविण्यासाठी नाशिक महानगरपालिका प्रयत्नरत आहे.
       मनपा क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या एकुण ५१७ शाळांतुन प्रशिक्षित शिक्षकांच्या समर्पित सेवेने २.९० लक्ष विद्यार्थ्यांना बालशिक्षण हक्क कायद्यानुसार मोफत आणि गुणवत्तापुर्ण शिक्षणाचा लाभ मिळत आहे. अभ्यासू आणि कायदेतज्ञ असलेल्या सभापति महोदयांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण समितीचे उपसभापती आणि सर्व सदस्य नव्या उमेदीने तळागाळातील विद्यार्थांच्या सर्वांगीन विकासासाठी झटत आहेत. मा. महापौर, मा. आयुक्त आणि मा. स्थायी समिती अध्यक्षांसह सर्व नगरसेवक पदाधिका-यांचे मार्गदर्शन त्यासाठी अनमोल लाभत आहे.
       मोफत शिक्षणाबरोबर सुसज्ज आकर्षक शालेय इमारत, स्वच्छ शुद्ध पिण्याचे पाणी, सकस पोषण आहार, सुसज्ज प्रयोगशाळा आणि बालवाचनालयाचे, क्रिडासाहित्य, योगा, कराटे, मोफत गणवेश, बुट-सोक्स, दप्तर, शैक्षणिक साहित्य, मोफत पाठ्यपुस्तके अशा विविध सुविधांसोबतच विद्यार्थ्यांच्या सुप्त क्षमतांचा विकास होण्यासाठी शिष्यवृत्ती परिक्षा, स्पर्धा परिक्षा, क्रिडा स्पर्धा, निबंध-वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. समाजातील वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना २५% आरक्षित जागांवर प्रवेश सुविधा हक्क देवुन त्यांच्या सर्वांगीण व गुणवत्तापुर्ण विकासासाठी महानगरपालिका शिक्षण विभाग प्रयत्नरत आहे. आमच्या शिक्षकांचे स्त्युत्य उपक्रम यशोगाथा आणि शिक्षणप्रेमी पदाधिकारी यांचे मनोगत जाणुन घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्यावी. ही विनंती.
       विद्यार्थी प्रगतीच्या हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी समाजातील दानशुर व्यक्ती सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, औद्योगिक कंपन्या आणि हॉस्पिटल्स नियमितपणे विनाशुल्क मदत करत आहेत. आम्ही त्यांचे उपकृत आहोत. समाज सहभागातुन मनपा शाळांची गुणवत्तापुर्ण भरभराट होणार आहे. याची आमच्या सर्व शाळा व्यवस्थापन समित्यांना जाणीव आहे. म्हणुनच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या शब्दात आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की,

"पाठीवरती हात ठेवुनी फ़क्त लढ म्हणा !"


धन्यवाद !